|| काकड आरती ||




Kakad Aarti-

This is a aarti sung in the glory of Shirdi Sai Baba also known as Sainath. Marathi Unlimited is the ultimate source of Marathi Arti Collection.

Kakad Aarti

काकड आरती करितो साईनाथ देवा | चिन्मय रूप दाखवी घेऊनि बालक लघु सेवा || धृ||

काम क्रोध मद मत्सर आतुनी काकडा | केला वैराग्याचं तूप घालूनी तो मी भिजविला |

साईनाथ गुरु भक्तीज्वलनें तो मी पेटविला | तदवृत्ती जाळूनी गुरूने प्रकाश मांडीला |

द्वैत तमानासुनि तत्स्वरूपीं मिळवी जीवा ||१||

भू-खेचर व्यापुनी अवघे हृत्कमळी राहसी | तोचि दत्तदेव तम शिर्डी राहुनी पावसी |

राहुनी येथें अन्यत्रही तें भक्तासत्व धावसी | निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसी |

न कळें त्वल्लिलाही कोण्या देवा वा मानवा ||२||

त्वद्यशदुंदुम्भीनें सारें अंबर हे कोंदले | सगुण मूर्ती पाहण्या आतुर जन शिर्डी आलें |

प्राशुनी त्वद्वचनामृत मानस त्वच्चरणीं वाहिलें | कृपा करुनिया साईमाऊले दास पदरीं घ्यावा ||३||

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड