इडलीचा उपमा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Idlicha Upma-Idli upma is a very delicious dish made with the leftover idlys. You can serve this dish in the breakfast which can be prepared in no time.It will take just 5-10 minutes. Get Full recipe Tips on Marathi Unlimited. Its unique source of recipes for Maharashtra People.
Idlicha Upma

 

आपण ईडल्या केल्यानंतर बऱ्याचदा उरतात, तर कधी सांबार संपल्या नंतर त्या कशासोबत खाव्या हा प्रश्न पडतो. तर त्या वाया जावू नये म्हणून त्या काही वेळ फ्रीज मध्ये ठेवून द्या व नंतर त्याचा उपमा करून खायला द्याव्या.

साहित्य :-

  • आठ ते दहा इडल्या
  • लाल सुक्या मिरच्या दोन
  • अर्धा चमचा मोहरी
  • एक चमचा बिना छील्क्याची उडदाची डाळ
  • किंचित हिंग
  • अर्धी वाटी खोबरे कीस
  • तेल

कृती :-

  1. फ्रीज मधून इडल्या काढून त्या मोकळ्या करून घ्याव्या याकरता तुम्ही मीक्संरचा वापर करू शकता.
  2. पातेल्यात  फोडणीसाठी तेल गरम करण्यास ठेवावे.
  3. तेल गरम झाल्यानंतर त्यात हिंग, मोहरी,मिरचीचे तुकडे उडदाची एक चमचा डाळ  किंचित चवी नुसार मीठ घालावे व मोकळ्या केलेल्या इडल्या  एकत्रित करून परतून घ्यावे.
  4. नंतर त्यात खोबरे कीस घालावे व दोन ते तीन मिनिटे परतल्या नंतर उपमा तयार.
  5. असल्यास वरून बारीक चिरून कोथिंबिर घालावी.
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा