|| श्री हरितालिकेची आरती ||




Shri Hartalika Aarti is sung to worship Mata Parvati (Also called as Mata Gauri) on the occasion of Hartalika Teej. This Vrat is is observed by both married and unmarried women. There is a legend behind the ritual to perform Hartalika Vrat :- To get God  Shiva as husband, Mata parvati did very tough penance for many years. After doing very difficult penance, finally lord Shiva pleased by her vrat and married her. Since then Mata parvati is worshipped as Hartalika.

Hartalika

जयदेवी जयदेवी हरितालिके  सखी पार्वती अंबिके | आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके ||धृ||

हर अर्धांगी वससी जासी यज्ञां माहेरासी | तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होसी || १||

रिघसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तुं गोमटी | उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठाउठी || २||

तपपंचाग्नि  साधने धुम्रपान अधोवदने | केली बहु उपोषणे शंभू भ्रतारा कारणे || ३||

लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी | पुन्हा वरिसी घुर्जटी मन रक्षावे संकटी || ४||

काय वर्णू तवगुण अल्पमती नारायण | मातें दाखवी चरण चुकवावे जन्म मरण || ५||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
4




,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड