भारत आणि त्याच्या उत्थानाचा मार्ग (स्वामी विवेकानंद )




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Top ways for the Reinvigoration of India .India is in the way of progress and has been struggling to grow its way out of one of its darkest … India culture and spiritual rituals are spoiling india. here are few ways for Reinvigoration of india.

indiaहा पृथ्वीच्या पाठीवर जर असा कोणता एखादा देश असेल कि ज्याला “पुण्यभूमी ” हे गोड आणि अन्वर्थक़ नाव अगदी यथार्थपणे देता येईल. …ज़र असे एखादे स्थान असेल कि जिथे माणसात कोमलता, शुचिता, दया, दाक्षिण्य, क्षमा प्रभूती सद्गुणांचा ईतर कुठल्याहीपेक्षा अधिक विकास झाला आहे जर अशी कोणती एखादी भूमी असेल कि जिला अंतर्दृष्टीचे आणि आध्यात्मिकतेचे माहेर घर म्हणता येईल तर ती म्हणजे आपली हि मायभूमी भारतच होय.

मी कोणासही असे आव्हान देतो कि त्याने भारताच्या इतिहासात असा एखादा तरी कालखंड दाखवून घ्यावा कि जेव्हा जगाला हालवून सोडतील अशा आध्यात्मिक महापुरुषांची भारतभुला उणीव भासली. परंतु भारताचे कार्य आहे आणि ते निनादाने व सैन्याची पुढे चाल केल्याने साधणारे नव्हे. भारताचा प्रभाव जगावर नेहमी नीरव दवबिंदूप्रमाणे पडत आला आहे, तो ठळकपणे अवलोकनात जरी येत नाही तरीही त्याने पृथावरील सुंदर सुंदर पुष्पाना फुलविले आहे.

आपल्या या मायभूमीचे अवघ्या जगावर अपर ऋण आहे.

धर्माच्या बाबतीत भारताने खिस्तीधर्मावर मोठा प्रभाव पडला आहे, कारण खुद खिस्तांच्या शिकवणीचा उगम बुद्धदेवांच्या शिकवणीत सापडू शकतो…. विज्ञानाच्या बाबतीतही हेच खरे आहे. भारताने प्राचीन काळी आरंभीचे शास्त्रज्ञ, वैध पुरविले आहेत. आणि सर विल्यम हंटर यांच्या मतानुसार भारताने विविध रासायनिक द्रव्याचा शोध लावून आणि विद्रूप झालेले नाक व कान कसे दुरुस्त करावेत हे तुम्हाला शिकवून आधुनिक भर घातली आहे. गणिताच्या बाबतीत तर भारताने याहून अधिक कार्य केले आहे. कारण बीजगणित, भूमिती, आणि आधुनिक विजय असे मिश्र गणित ह्या सर्वांचा भारताचा शोध लागलेला आहे. इतकेच नव्हे, तर वर्त मानकालीन सर्व सुधारनाची आधारशीला असे जे दहा अंक ते भारतातच शोधले गेले. त्यांची नावे देखील वस्तुत: संस्कृत आहेत. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात, थोर जर्मन तत्वज्ञ शोपेनहार यांनी मान्य केल्याप्रमाणे, आम्ही आजही ईतर देशापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहोत. संगीताच्या क्षेत्रात भारताने जगाला सात मुख्य स्वर असलेली आपली स्वरपद्धती दिली……. भाषा शास्त्रात आमची संस्कृत भाषा हि आता सर्व युरोपियन भाषांचा मूळ पाया म्हणून सर्वमान्य झाली आहे. युरोपातील सर्व भाषा ह्या वस्तुत: संस्कृतच्या केवळ अपभ्रष्ट अशा बोलभाषा आहेत.

साहित्यात आमची काव्ये, महाकाव्ये आणि नाटके जगातील कोणत्याही भाषेतल्याइतकी श्रेष्ठ आहेत. एका सर्व श्रेष्ठ जर्मन कवीने आमच्या शाकुंतला चे सार “स्वर्ग आणि धरा यांचे मिलन” या शब्दात वनिर्ले होते. भारताने जगाला इसापच्या नीतिकथा दिल्या. त्या कथा इसापणे एका प्राचीन संस्कृत पुस्तकावरून घेतल्या होत्या. अरबी भाषेतील सुरस गोष्टी भारताने दिल्या आहेत. तसेच, सिंडेला व बिन स्टॉकस हि कथा देखील भारताने दिली आहे. उदोगाच्या क्षेत्रात, कापूस आणि तीळ यांची निर्मिती प्रथम भारताने केली. जडजवाहीराच्या कामात भारत हा निपुण होता आणि साखर हि भारताची निर्मिती आहे. “शुगर” हा शब्द देखील मूळ भारतीय आहे. बुद्धीबळे, पते आणि सोंगट्या हे खेळ देखील भारतानेच शोधून काढले आहेत. वस्तुत: प्रत्येक बाबतीत भारताची श्रेष्ठता इतकी मोठी होती कि त्यामुळे आकर्षित होऊन युरोपातील टोळ्या हिंदुस्थानच्या किनाऱ्याकडे ओढल्या गेल्या आणि अप्रत्यक्षपणे यांचाच परिणाम म्हणून अमेरिका खंडाचा शोध लागला

आपल्या देशाच्या इतिहासाकडे मी पाहतो तेव्हा, मानवी मनाच्या विकासासाठी ज्याने एवढे भरीव कार्य केलेले आहे असा दुसरा एकही देश मला या पृथ्वीच्या पाठीवर आढळत नाही. म्हणून माझ्या या देशाची निंदा करीत नाही: मी आपल्या देश बांधवाना सांगतो, ” तुम्ही आजवर चांगलेच केले आहे, आता अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा.”

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu