वृद्धत्यावर मात




Like
Like Love Haha Wow Sad Angry

The challenges of old age Let’s face it: old age is what lies ahead. If you’re 40 or 50 or even 60, you might not give much thought to the health challenges of aging.

article-0-15565634000005DC-302_634x423एखाद्या माणसाला त्याचे वय विचारले की आपल्या जन्मतारखेप्रमाणे आपले वय किती आहे ते सांगतो, यालाच कालक्रमाला धरून सांगितलेले वय असे म्हणता येईल. व्यवहारात असे वय सांगणे योग्य असेल तरी आपले शारीरिक, मानसिक व सामाजिक वय किती आहे. या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. एखादा ५० वर्ष चा माणूस २५-३० वर्षाच्या माणसाएवढा दिसतो किंवा एखादा ३० वर्षाचा माणूस ५० वर्षाच्या माणसाएवढा दिसतो. दूश्य शरीरावरून काही वेळा आपण माणसाचे वय अंदाजे किती असेल हे ताडू शकतो. पण त्याचा शरीरातील अवयवावर आणि पेशींवर त्याचा वयाच्या किती परिणाम झाला असेल. हे आपल्याला सांगत येत नाही. शरीरातील अवयवांवर आणि पेशींवर कालमानाप्रमाणे झालेला परिणाम याला जैविक वय असे म्हणतात.
शरीरातील प्रत्येक अवयव व पेशी यालयाला जाणार असल्या तरी प्रत्येक वव्यकक्तीप्रमाणे हा काल वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक व्यक्तीचा विचा केला. तर ही क्रिया फार गुंतागुंतीची असते.एखाद्या व्यक्तीचे स्नायू, ह्दय, मुत्रपिंड हे अवयव फारसे चांगल्या तऱ्हेने काम करत नसतील. त्यामुळे दोन ७० वर्षाच्या माणसांची शारीरिक किंवा जैविक वय किती  असेल हे ठरविता येणे अवघड आहे.
थोडक्यात शरीरिक किंवा जैविक वय हे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलणारे असते. नियमित शारीरिक व्यायाम, योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि आदर्श जीवनपद्धती ठेवली तर म्हातारपणी सुद्धा बरेचसे वृद्ध फिट राहतात. तुम्ही शरीराला कसं ठेवता यावर तुमचे शारीरिक वय अवलंबून असते. शारीरिक वयांपेक्षाही जास्त लवचिक असते. ते मानसिक वय शारीरिक वयाप्रमाणे मानसिक वयही प्रत्येक व्यक्तीप्रमाने वेगवेगळे असते. प्रत्येक व्यक्तीच्या विचारसरणीप्रमाणे स्वभावाप्रमाणे त्याचे मानसिक वय हे बदलत असते. खालील मानसिक कारनांमुळे “एजिंग प्रोसेस” लवकर होत असते. असे लक्षात  आले आहे.

१)नैराश्य……..उदिग्नता

२)सतत मानसिक दडपण

३)तडजोड करता न आल्यामुळे.

४)एकाकीपणा

५)निरुघोगी माणसांमध्ये.

६)आर्थिक विवंचना, कर्जबाजारी होणे.

६)सतत अतिपरिश्रम केल्यामुळे …

८) चिडचीडेपणा, शीघ्रकोप किवा संताप.

९) टीका सहन करण्याची ताकद नसल्यामुळे

१०) अतिम्ह्त्वाकाशी, लोभी

या उलट खालील कारणांमुळे “एजिंग प्रोसेस” विलंबित किंवा सावकाश होते.

१)कौटुंबिक समाधान

२) जीवनात यश मिळवण्याचा आनंद

३) सहजपणे हसण्याची कला व विनोदबुद्धी

४) समाधानी लैंगिक जीवन

५) मित्र व नातेवाईक यांच्याशी जवळचे व आपुलकीचे संबंध

६) नियमित दैनंदिन क्रम.

७) सक्रियपणे जीवन जगणारा.

८) मोकळा वेळ आनंदात व मनोरंजनात घालविणारा आनंद देणारा,जोपासणारा,

९) आशावादी वृती.

१०) आर्थिकदूष्ट्या स्वावलंबी

    यावरून एक लक्षात येईल की , तुमचे वय हे तुमचे मन ठरवित असते. मन हे लवचिक असते. पण त्या लवचीकतेचा उपयोग प्रत्येक माणूस योग्यपणे करू शकत नाही.मन हे सतत बदलू शकते,तुम्ही त्याला घडवू शकता फक्त इच्छा हवी तसा विचार करण्याची शक्ती हवी आणि विवेक हवा. बरीच माणसे फक्त कायम स्वत:चाच विचार करत असतात. मी म्हणजे विश्व असत त्यांना वाटत असते.मी हाच त्यांचा केंद्रबिंदू असतो. विचारही स्वत:बाबतच चालू असतात. जो माणूस आयुष्यात मी, माझा आणि माझे हे शब्द जास्त प्रमाणात वापरतो. तो जास्त मानसिक तणावाखाली राहतो आणि त्यामुळे ह्दयविकार होण्याची शक्यता अधिक असते असे एका पाहणीत आढळून आले आहे.तेव्हा अहंपना सोडा हे जे सांगितले जाते, त्याला वैघकिय शास्त्राचाही  आधार आहे असे म्हणायला पाहिजे. स्वत :चेच काय ते दुसऱ्यांनी ऎकायला पाहिजे ही वृत्ती सोडून दुसऱ्यांचेही  आपण ऐकायला शिकले पाहिजे. दुसऱ्यांच्या मताचा विचारांचा आदर केला पाहिजे.

दुसऱ्यांसाठी आपण आपला वेळ व शकती खर्च करण्याची मानसिक तयारी प्रत्येकाजवळ हवी. तसेच फक्त स्वत:वर प्रेम करण्याऎवजी दुसऱ्यांवरही प्रेम केले पाहिजे. आपण दुसऱ्यांवर प्रेम केले तर तितकेच ते आपल्याला परत मिळण्याची शक्यता असते. प्रेमळ व्यकतीचे वृद्धत्वही सुखकर होते व सुखकर जाते. शारीरिक वय हे नेहमीच तुमच्या मानसिक वयावर अवलंबून असते मन जर कायम प्रफुलित ठेवण्याचा प्रयत्न केला तर शरीरही त्याला उतम प्रकारे साथ देते. प्रतिसाद देते. नेहमी आनंद समाधान व सुखी राहिलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने “वृद्ध” झालात,परिपक झालात. यासाठी कायम आत्मपरीक्षणाची सवय मनाला लावून घ्या. आपल्या अंतर्जीवणाकडे त्रयस्थ माणसाप्रमाणे बघायला शिका. तसेच शिक्षण स्वत:च्या मनाला घा. मन घडविण तुमच्या हातात असते तेवढा विवेक हे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. तरच तुमचे म्हातारपण सुद्धा सुसहा  होईल. म्हातारपणाचा पराभव करायचा असेल तर विवेकबुद्धी  ठेवा आणि सतत आनंदी व समाधानी राहण्याचा पर्यटन करा. तरच म्हातारपणाशी चालू असलेली लढाई तुम्ही जिंकू शकाल .

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu