मटन बिर्याणी




Mutton Biryani

Mutton Biryani Recipe, Learn how to make Mutton Biryani (absolutely delicious recipe of Mutton Biryani ingredients and cooking method). learn here how to Make Mutton Biryani in easiest and fastest way.

matan

शिरी -: एक किलो मटन,अर्धा बासमती तांदूळ , अर्धा किलो कांदे, एक ईंच दालचिनी तुकडे, ७, ८ वेलची, १० मिरी दाणे, २ चमचे जिरे, एक गाठ लसून, आल्याचा एक इंच तुकडा, ६लवंग, २चमचे हळद, २ चमचे गरम मसाला, २ चमचे तिखट, मुठ्भर पुदिना पाने १०, १० बदाम, काजू काप, किसमिस तळलेले, अर्धा कप दुध, एक चमचा केशर, एक वाटी दही, उकडलेल्या दोन अंड्याच्या चकत्या, दीड वाटी तूप, तीन बटाट्याचे उभे तुकडे तळलेले, ३ ते ४ पिवळा फूड रंग, चवी नुसार मीठ.

कृती -: तांदूळ धुवून ठेवावे, मटणाचे तुकडे करून स्व्च्छ करावे, त्यात आले-लसुनाची पेस्ट करून मटणाच्या तुकड्यांना चांगली घोळून घ्यावी. त्यातच दही घालावे. एक ते दीड तास तसेच झाकून ठेवावे. कांदा पातळ व लांब चिरून तुपावर तांबूस परतून घ्यावा. तूप गरम करुन त्यात लवंगा, दालचिनी, वेलची भाजून पावडर करून घ्यावी, मिरीचीपुड, गरम मसाला पुदिना हे सर्व मसाले जिन्नस व चवी नुसार मीठ मटणात घालून मटन शिजवावे. इकडे दुसर्या भांड्यात थोडे तूप गरम करून जिरे फोडणी करून त्यात तांदूळ परतावे, चवी नुसार मीठ घालून अर्धवट शिजवावे नंतर त्यात तळलेला तिखट, तळलेला बटाटा, कांदा, मिरी पावडर, खान्याचा पिवळा रंग व केशर (किंचित दुधात मिसळून द्रव करून) सोडावे तसेच काजूचे बदामाचे तुकडे त्यात घालावे, व पूर्ण पणे मोकळा भात शिजवावे, नंतर मटन व भात एकत्रित मिक्स करून ठेवावा.व सर्व्ह करतेवेळी, त्यावर उकडलेला अंड्याच्या चकत्या व कोथिंबीर बारीक चिरलेली पसरावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड