कश्मीरी पुलाव




I love it very much. As it is mildly spiced and a little sweet, you can pair it with any spicy gravy. Today we will learn how to make Kashmiri Pulao …the kashmiri pulao is aromatic, mild and sweet…

kashmiri-pulao-1

साहित्य-: बासमती तांदूळ दोन वाट्या, सफरचंद २, अननसाच्या चकत्या (ताजा अननस स्वच्छ करून साखरेच्या पाण्यात वाफवून नंतर वापराव्या. २ वाटी मटार, १ वाटी पनीरचे तुकडे (तळलेले) ७ जर्दाळू, काजू तुकडे, बादाम काप, निसलेले पिस्ते, बेदाणे,  चिमुटभर हिंग, थोडी केशर, ४ लवंगा, दोन तुकडे दालचिनी, ५ सुक्या कश्मीरी मिरच्या, ४ साधी वेलचि, दन मोठी वेलची, एक तमाल पत्री, १० काळीमिरी, ५ चमचे तूप, आणि मीठ, पाणी

कृती -: तांदूळ एकतास अगोदर धुवून निथळत ठेवावे. एक तास पूर्वी बादाम पिस्ते पाण्यात भिजवून ठेवावे नंतर पाण्यातुन काढून ठेवावे. सफरचंदाच्या साधारण फोडी करून ठेवाव्यात बिया काढून घ्याव्या. जर्दाळू मधील बिया काढून त्याही पाण्यात भिजवून काढून ठेवाव्या.
पातेल्यात तूप गरम करावे त्यात हिंग घालावे नंतर लवंग, दालचिनी, दोन्ही प्रकारचे वेलदोडे, मिरे तमालपत्री,  जायपत्री,  सुक्या मिरच्या, घालून फोडणीत शिजू द्याव्या नंतर निथळलेले तांदूळ, घालून चांगले परतावे व चवीनुसार मीठ घालावे . नंतर गरम पाणी टाकून भात अर्धवट शिजू द्यावा, दुसर्या भांड्यात थोडे तूप घालून फोडणी करावी त्यात कांदा तळून घ्यावा, मटार ही तुपावर भाजून घ्यावे, हे सर्व बाजूला काढून ईकडे अर्धवट शिजलेल्या भातात सर्व फळांच्या फोडी मटार, काजू-बेदाणे जर्दाळूचे तुकडे, केशर (दुधात घोटलेले असावे) घालावी, व परतून मिसळून घ्यावे, नंतर परत वाफ आणवून भात मोकळा शिजू द्यावा. पुलाव वाढताना त्यात तळलेला कांदा, बदाम-पिस्त्याचे काप व चेरी वरून सजवून द्यावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड