ड्राय पनीर चिली रोल




Hot and spicy Dry Paneer Chili Roll prepared with this step by step procedure with delicious delight test anytime. You serve as starter or serve as side dish with Chinese fried rice or, it’s definitely going to leave your taste .

Chilli-Paneer-Dry साहित्य-: १०० ग्राम पनीर, कॉर्नफ्लोअर ४ चमचे, बारीक चिरलेली १ सिमला मिरची, १ कांदा बारीक चिरून, सोयासॉस अर्धी वाटी, व्हीनीगर ५ चमचे,  अजिनोमोटो १ चमचा, कोथिंबीर चरून अर्धी वाटी,  आले-लसून पेस्ट चार चमचे, पाच लसून पाकळ्या बारीक चिरून, तेल ३ वाट्या, मैदा एक वाटी, साखर दोन चमचे, चवी नुसार मीठ, सोबत चटणी. दोन कांदे पातळ चिरलेले.

कृती-: कॉर्न फ्लोअर भिजवून घ्या. पनीरचे १० तुकडे  करून ते भिजवलेल्या कॉर्नफ्लोअर मध्ये घोळून ते मंद आचेवर गरम तेलात तळून घ्या. ते थंड होवू द्या व त्याचे परत बारीक तुकडे करा. मैद्यात अर्धी वाटी तेल गरम करून घाला नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली सिमला मिरची, २ चमचे सोयासॉस, दोन चमचे व्हीनीगर, आलेलसून पेस्ट, चवीनुसार मीठ, थोडी साखर त्या मैद्यात घाला व कमी पाण्यात घट्ट भिजवा. नंतर एका नॉनस्टिक कढईत पाच चमचे तेल तापवा त्यात बारीक चिरलेला लसून टाका व परता, त्यात पातळ चीरलेला कांदा, व थोडी बारीक चिरलेली सिमला मिरची घालून परता त्यात चिरलेले पनीर घाला व मोकळे होएस्तोवर परता व नंतरहे सारण थंड होवू द्या. एकीकडे कढईत तेल तापवायला ठेवा. भिजवलेल्या पिठाची लाटी करून चौकोनी लाटा तिच्या मध्यभागी पनीरचे सारण भरा व त्याचा रोल करा व कडा दाबून घ्या गरम झालेल्या तेलात मंद आचेवर तांबूससर तळून घ्या. या प्रमाणे संपूर्ण रोल तयार करून तळून घ्या व गरम गरमच चटणी सोबत सर्व्ह करा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड