ओल्या पोपटीच्या शेंगातील दाण्याचे आळण




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Thick Pea Soup or Poptiche Adan is very famous recipe in Maharashtra and rest of India. all Indian loves Pea Soup(Poptiche adan). here is the complete recipes in Marathi about Pea Soup. Its very easy to cook and serve, you can eat Pea Soup(Poptiche adan) alone or with rice. test this delicious recipe . Pea soup. This is more like a thick pea casserole than a soup and as well as being a traditional Romanian dish.

Thick Pea Soupसाहित्य -: एक पाव दाणे, एक कांदा, मोठे तीन टमाटे, पाच हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली एक वाटी, एक चमचा आले लसून पेस्ट, मोहरी एक चमचा, जिरे एक चमचा, एक छोटा चमच तिखट, अर्धा चमचा हळद, चवी नुसार मीठ, एक पळी बेसन पीठ बेसन नसल्यास तांदळाचे पीठ, दोन पळी तेल.

कृती -: शेंगातील दाणे काढून त्याला पाणी गरम करून त्यात दाणे साधारणत: नरम उकडून घ्यावे. व त्यातील पाणी काढून घ्यावे ते पाणी ठेऊ नये. दुसऱ्या स्व्च्छ पाण्यातुन दाणे काढून घ्यावे. तांदळाचे पीठ लिक्विड करून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा. हिरव्या मिरचीचे उभे काप करावे. टमाटे बारीक तुकडे करून घ्यावे. कोथिंबिर बारीक चिरून घ्यावी.

कढईत दोन पळी तेल फोडणीसाठी चांगले गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, टाकावे, पेस्ट  नंतर मिरचीचे काप व नंतर लगेच कांदा टाकावा, कांदा लालसर झाला. म्हणजे तिखट, हळद  नंतर मीठ चवी नुसार, व बारीक चिरलेले टमाटे टाकावेत व  फोडणी तेल सुटेस्तोवर शिजू द्यावी नंतर पोपट दाणे टाकावे व दाणे नरम शिजेस्तोवर फोडणीत होउ द्यावे. एकी कडे एक ते दीड ग्लास पाणी उकलुन घ्यावे, दाणे चांगले शिजले कि ते उकडलेले पाणी त्यात टाकावे, व परत उकळी येऊ द्यावी. नंतर ते थोडे घट्ट येण्या करीता तांदळाचे पीठ त्या उकळीत साधारण अंदाजे  सोडावे, पीठ सोडताना पळी त्यात फिरवत ठेवावी (कारण त्याचे गोळे होऊ नये त्याकरिता) नंतर त्याला चांगली एक उकळी येऊ द्यावी, व नंतर कोथिंबीर सोडावी. बेसना प्रमाणे जास्त घट्ट होऊ देऊ नये. आळण थोडे पातळच चविष्ट वाटते.

गावा कडील ज्यावेळी चना  किंवा लाख यांची (पाले भाजी) शेतात निघते. त्यावेळी बर्याच गावकरी बाया मंडळी त्या भाजीचे कोवळे शेंडे तोडून घरी आणून स्व्च्छ निवडून सावलीत वाळवून त्याची पावडर करून ठेवतात.त्या भाजीला गावा कडे भाजी भुरका किंवा कूकसाभाजी  म्हणून संबोधल्या जाते. आपल्या शहरात हि भाजी पावडर मिळत नसली तरी पाले भाजी बाजारात विकायला येते त्यावेळी ती घेऊन आपण सुद्धा घरी आणून सावलीत वाळवून हि पावडर करू शकतो. या पावडरीचे आळण अतिशय स्वादिष्ट लागते, व ते भात पोळी किंवा भाकरी सोबत सुद्धा छान वाटते. रोजच्या जेवणा पेक्षा जास्त जेवण त्या दिवशी आपण हमखास करतो.

तेव्हा हे चना किंवा लाखोरी या पाले भाजीच्या पावडरीचे आळण कसे करायचे ते वाचू व बनवून बघू.

साहित्य -: भाजीची पावडर ( लाखोरी किंवा चना पावडरीची कृती एकच प्रकारे आहें) अर्धा कप पावडर, तीन मोठे टमाटे बारीक चिरून घ्यावे , पाच हिरव्या मिरच्याचे उभे काप, एक छोटासा कांदा बारीक चिरून घ्यावा. किंचित हळद ( तिखट अजिबात नको त्याने चव बदलते) एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन छोटे चमच तांदळाचे पीठ, एक पळी तेल (तेल जास्त वापर करू नये त्यानेही चव बदलते.) चविनुसार मीठ.

कृती -: तांदळाचे पीठ सर्व प्रथम भिजवून लिक्विड करून ठेवावे. कढइत एक पळी तेल टाकून गरम करण्यास ठेवावे . गरम झाल्यास मोहरी जिरे काहीच टाकू नये, सर्व प्रथम मिरचीचे उभे काप टाकावे  ते जळू नये म्हणून लगेच बारीक चिरलेला कांदा टाकावा, कांदा व मिरचीचे काप तळले कि भाजी किती करावयाची यानुसार मीठ, बारीक चिरलेले टमाटे, भाजीची पावडर फोडणीत टाकावी. टमाटे नरम झाले कि (तेलात जास्त वेळ पावडर शिजवू नये) एकी कडे पाणी दोन ग्लास उकळीला ठेवावे, ते गरम पाणी फोडणीत सोडावे व नंतर भाजीत चांगले उकळू द्यावे, त्यानंतर किंचित घट्ट होऊन एकजीव होण्या करीता तांदळाचे पीठ त्यात सोडावे व पळीने फिरवत जावे, जेणे करून त्यापिठाचे गोळे जमू नयेत. कढी प्रमाणेच पातळ होईल तेवढेच. नंतर उकळी येऊ द्यावी व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. हे आळण फारच छान वाटते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा