Man he Sanskarksham Ahe”: Marathi Article based upon the stability and wealthy Mind. Keep your mind always free from dust and wrong things. Marathi article written by Pradeep Narhari Kelkar, Thane Maharashtra.
मला एक गोष्ट आपणाला सांगावयाची आहे ती अशी की आपलं मन हे संस्कारक्षम आहे, संवेदनशील आहे. आपण कधीही वाईट विचार नक्कीच करीत नाही. सदोदित चांगला विचार करतो. चांगले विचार मनाला प्रसन्न करीत असतात. चांगले विचार आपल्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करावयाचा किंवा आनंदी कसे रहावयाचे हे शिकवीत असतात. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगता येत नसल्याने, आपण आपल्या मनाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवलयास आपल्या आनंदी जीवनात समाधानाची सुगंधित पुष्पे फुलून बहरतील. आपल्याला काही समस्या निर्माण झाल्या तरी त्या समस्येचे निराकरण कसे करावयाचे हे विचार सहजरीत्या उमजतील असं मला वाटत. सुसंस्कृत मनातील विचार हे नेहमीचं मार्ग दाखविणारे असतात यात शंका घेण्याचे कारण नाही असे माझे मत आहे. सुंदर विचार…सुंदर आयुष्य असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आपण आपल्या आयुष्यात सतत काहीतरी नवनवीन शिकत असतो. ज्या गोष्टी आपण शिकलो त्या आपण कधीही विसरत नाही. मनामध्ये त्या जतन केल्या जातात असे मी आवर्जून म्हणेन. यासाठी अंतर्मनही आपल्या मनाला सहाय्य करीत असते. कधीच वाईट विचार मनात आणू नयेत आणि आपलं मन दु:खी करू नये. ज्ञानरूपी प्रकाश आपल्याला आनंदी, समाधानी ठेवून आयुष्य सुंदर फुलवीत असतो. म्हणूनच आपल्या मनाचे दरवाजे सदैव उघडे ठेवावेत नी समाधानी आनंदित जीवनाचा लाभ घ्यावा. एक सुंदर अनुभूती घ्यावी असा मला वाटतं. हरी ओम.
प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, ३००८२१३.