मुंबई : ऑस्ट्रेलियात १९८५ मध्ये खेळल्या गेलेल्या विश्व क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांतील खेळाडूंनी स्वाक्षरी केलेल्या बॅटला लिलावात साडेचार लाख एवढी किंमत मिळाली. महान क्रिकेटपटू रणजितसिंह यांची स्वाक्षरी असलेले ‘ज्युबली बुक ऑफ क्रिकेट’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीलासर्वाधिक १.0८ लाख रुपये किंमत मिळाली. लॉर्ड्सवर जून १९३२ मध्ये खेळलेल्या भारताच्या पहिल्या कसोटी संघाच्या छायाचित्राला लिलावामध्ये ९0 हजार रुपयांची किंमत मिळाली.