स्त्री: का पुजता मज दुर्गा म्हणुनी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

का पुजता मज दुर्गा म्हणुनी
मागाया शक्ती अपुल्या अंगी
माझ्याच मुलीवर अत्याचाराला ?
तू नपुनसकतेचा झालास धनी ….
का पुजता रूप सरस्वती
विद्देची मज भिक मागता
माझ्याच अंशाला अपवित्र करण्या ?
गर्व विद्याविभूषित मिरवता

दिवाळीलाही मीच पुज्य (लक्ष्मी)
संमपन्नता दारी येयील कशी ?
पैशाचा मग माज चढता
नाचाया समोर हवी स्त्रीच उभी ?

प्रेम आणि सहनशीलता मी
जननी , अन्नपूर्णाहि जरी मीच
पण विसरू नको हे व्यभिचारी नरां
रुद्रही मीच आणि कालीही मीच ….

नको आटवू पाझर मज प्रेमाचा
अधिकार मज मग नरलिंग माराचा
उत्तराखंड हे अंश मज क्रोपाचा
नकोश बनू कारण पृथ्वी नाशाचा …..
पृथ्वी नाशाचा….पृथ्वी नाशाचा….

तुषार शेळके

ka pujata maj durga mhanuni

Marathi Kavita “Ka Pujata Maj Durga Mhanuni” .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu