अवतीर्ण ३० एप्रिल १९०९ — ब्रम्हलीन ११ आक्टोंबर १९६८
वंद्नीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद देवून निधून गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! ठेवले होते.
इ.सन.१९२५ मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली.दि. २३ फेब्रुवारी १९३५ शनिवार रोजी सालबर्डी येथील अज्ञांत आले. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. २८ ऑगष्ट१९४२ शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेम्बर मध्ये सुटका झाली. १९४३ मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला.५ एप्रिल १९४३ सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोहेंबर १९४३ शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली.हरीजनां साठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा । भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे ।”
ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत. प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरु स्मरण व अंधश्रद्धा, वाईटरूढी,व्यसने यांचा त्याग करा. अस्या आशयाचे थोडा वेळ भाषण केले कि, हातातील खन्जरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होवून जाई. सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले. व त्यांना राष्ट्र संत तुकडोजी या नावाने संबोधू लागले. ‘ ग्रांमगीता’ लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे हे समजाविले.भारत कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचविली. सामुदायिक प्राथना करावी. सर्वांशी प्रेमाने वागाव. गोवध बंदी, व पशु संर्वधन करावे हे शिकविले.
दिनांक २३ एप्रिल १९४७ बुधवारी श्री गुरुदेव आश्रम नागपूरचे उद्धाटन केले. भारताचे राष्ट्रपती श्री राजेंद्र प्रसाद यांचे कडून त्यांना १९४९ मध्ये ‘राष्ट्र संत’ उपाधी प्राप्त झाली.प्म्ध्र्पुरात १९४९ साली त्यांनी संत सम्मेलन घेतले.विश्वधर्म परिषद व विश्वशांती साठी ते सयाम, ब्रम्हदेश, व जपान येथे जावून आले. तेथे सर्व धर्म व सर्वांचा देव एकच आहे, हे खंजेरीद्वारे भजनातून सांगितले. ( हर देश में तू ,हर भेष में तू । तेरे नाम अनेक तू एकही है ‘।। )
भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गुरुकुंज मोझरीला भेट देण्यासाठी इ.सन १९ मार्च १९५६ रोजी रविवारला गेल्यात. चीन युद्ध १९६२ व पाकीस्थान युद्ध १९६५ झाले तेव्हा सैन्यास धीर देण्या साठी स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गाईली, व सैन्याचे धैर्य वाढविले. ते फ़ार प्रयत्नवादि होते.तन,मन,धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्र संत होऊन गेले. दिनांक ११ आक्टोंबर १९६८ गुरुवार रोजी हे वंदनीय राष्ट्रसंत ब्रम्हलीन झाले. त्यांचे चरणी आपले शत: शत: प्रणाम !
Rashtrasant tukdoji maharaj marathi essay, Information on Rashtrasant Tukadoji Maharaj, read essay Marathi essay on tukdoji maharaj.
1 Comment. Leave new
Rashtsant tukdojimaharj all book