हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा




Chopper Deal Corruption

indexपुन्हा एक घोटाळा ….

एका इटालीयन कंपनीक़डून 12 VVIP हेलिकॉप्टरची खरेदी करण्यासाठी लाचखोरी केल्याचा माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांच्यावर आरोप झाल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटल आहे .संरक्षण मंत्रालयानं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. इटलीमधल्या फिनमेकॅनिका या कंपनीची अगस्ता वेस्टलँड जातीच्या विमानांची ही खरेदी करण्याचा करार झाला होता. परंतु या करारापोटी ३५० कोटी रुपयांची लाच दिल्याचे म्हटले जात आहे. म्हणून कंपनीच्या सीईओला रुपयांच्या दलाली प्रकरणी अटक करण्यात आली आहे.याबाबत माहिती देताना संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी त्यागींच्या सहभागाबाबत स्पष्ट बोलण्यास नकार दिला. मात्र आरोपांमध्ये तत्थ्य असेल, तर हा करार रद्द केला जाईल, असंही अँटोनी यांनी म्हटलंय. दरम्यान, हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात कसलाही सहभाग नसल्याचे हवाई दलाचे माजी प्रमुख शशी पी. त्यागी यांनी म्हटलंय. आपला कार्यकाल सुरू होण्याआधीच याबाबतच्या टेंडरमध्ये बदल करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यागी यांच्यावर करण्यात आला आहे. ऑगस्टा वेस्टलँडमूळ कंपनी `फिनमेकॅनिका`चा मुख्य कार्यकारी अधिकारी गिसेपी ओर्सी यांना काल मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी चौकशीसाठी आपण तयार असल्याचे त्यागी यांनी सांगितले. अगस्तावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. हा व्यवहार तातडीनं रद्द करण्याची मागणी भाजपनं केलीय. तसंच तत्कालीन वायू दलाच्या प्रमुखांचीही चौकशी करण्याची मागणी भाजपनं केलीय.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड