मुंबई विधानभवन परिसरातील एक संतापजनक प्रकार.
मुंबईतल्या विधानभवन परिसरात एक संतापजनक प्रकार घडला . राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया ( MLA Sandeep Bajoria) आणि शेकाप पक्षाचे आमदार जयंत पाटील ( MLA Jayant Patil ) या दोन आमदारांमध्ये आज चांगलीच हमरीतुमरी झाली व एकमेकांना भिडले. शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला.
आमदार संदीप बाजोरिया यांना जयंत पाटील यांनी काही टोमणा मारल्यामुळे हा प्रकार घडला. जयंत पाटील ह्यांनी सिंचन घोटाळ्यात संदीप बाजोरिया यांच्यावर काही आरोप केल्याने त्यांच्या राग अनावर झाल्याचे समजते. त्यामुळे विधानभवन परिसरातच या दोन्ही आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. त्यामुळे जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे आमदारच जर असे वागू लागल्यास कायदाचा धाक कोणाला राहणार असा प्रश्न विचारला जातोय.
Source : Marathi Unlimited.