Gajarchya wadya :
Gajarchya wadya is a sweet dish in maharashtra made with carrots, dry fruits and other ingredients having lots of nutrition in it. Kids mostly prefer such sweet dishes with dry fruits.
साहित्य: चार वाट्या गाजराचा कीस,एक वाटी खवा,एक चमचा वेलची पूड, काजू-बदामाचे काप, एक चमचा तूप.
कृती : कढईत चमचाभर तूप घालून गरम झाले किगाजराचा कीस परतून घ्यावा. नंतर साखर घालून मंद आचेवर शिजू द्यावे. सतत ढवळावे. दुसर्या भांड्यात खवा परतून घ्यावा. गाजर व साखरेचे मिश्रण शिजल्या नंतर घट्ट येऊ लागले की त्यात परतलेला खवा घालावा. नंतर मंद आचे वर हे मिश्रण घट्ट होऊ द्यावे. गोळा कढई पासून सुटू लागला कि त्यात वेलची पूड मिसळावी. ताटाला तुपाचा हात फिरवुन त्यावर गोळा जाड पोळी प्रमाणे थापावा. वरून काजू-बदामाचे काप थापावे. गार झाल्यावर वड्या सुरीने कापाव्या.
Source : Marathi Unlimited.
Get Latest collection of food recipes on Marathi unlimited. read Gajar Wadi Recipes tips here.