विमानांची दाटी अंतरिक्षि देव




Like
Like Love Haha Wow Sad Angry

namdevache abhang

विमानांची दाटी अंतरिक्षि देव । करिताती सर्व गर्भस्तुती ।।
सतरा अक्षरांत असे तुझी मूर्ती । यज्ञेशा तुज प्रती नमो नमो ।।
सहाजणें भांडती नवजणी स्थापिती । न क ळे  कोणा प्रती अंत तुझा ।।
अठरा जणे तुझी वर्णिताती किर्ती । गुणातीत श्रीपती तुज नमो ।।
चौघांजणा तुझा न कळेची पार । श्रमसी वारंवार आम्हांसाठी ।।
अठ्ठ्यान्शी सहस्त्र वर्णिताती तुज । ब्रम्हांडाचे बीज तुज नमो ।।
जन्म मरणाचे नाही तयां भय । आठविती पाय तुझे देवा ।।
नवजणी तुझ्या पायी लोळतांती । परब्रम्हमूर्ती तुज नमो।।
नामा म्हणे ऐशी  करिताती स्तुती । पुष्पे वाहुनी जाती स्वस्थळासी ।।।।

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Menu