ऐसा कलियुगीचां आचार ।क्रिया भ्रष्ट जाले नर।।
मंचका वरी बैसे राणी । माता वाहतसे पाणी ।।
स्त्रियेसी अलंकार भुषण । माता वाळीतसे शेण ।।
स्त्रियेसी पाटावाची साडी । माता नेसे चिंध्या लुगडी ।।
सासू-सासर्या योग्य मान ।मायबापा न घाली अन्न ।।
साली सासवा आवडती । बहीण-भावा तोंडी माती ।।
स्त्रियेसी एकांत गोडी ।मातेसी म्हणे रांड वेडी ।।
म्हणे विष्णू दास नामा ।एसां कलियुगाचा महिमा ।।
स्त्रियेचे एकोणी उत्तर सख्या बंधुसी पाडी वैर।। ९।।
Source : Marathi Unlimited