स्वप्नदोष कसा दूर करावा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

swapndosh ek ajar. kasa bara hotoखाली स्वप्नदोष बरा करण्या करिता काही उपाय दिले आहे. स्वप्नदोष हा बरा होणारा आजार आहे. स्वप्नदोष ही समस्या दूर करण्यासाठी काही उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. त्यासाठी आल्याचा रस 2 चमचे, कांद्याचा रस 3 चमचे, मध दोन चमचे, 2 चमचे गायीचे तूप यांचे मिश्रण सेवन करा. यामुळे स्वप्नदोष दूर होतो तसेच वीर्यातही ताकद येते. कडूलिंबाचा पाला खाल्यानेही स्वप्नदोष दूर होतो. आवळ्याचा मुरांबा रोज खावा आणि गाजराचा रस प्राशन केला पाहिजे. तुळस ही औषधी आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो. तुळशीचे मूळ बारीक करून पाण्यासोबत प्यायल्याने लाभ होतो. तुळशीचे मुळ उपलब्ध नसेल तर तुळशीच्या मंजुळा घ्याव्यात. वयात येणाऱ्या मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्ये स्वप्नदोष ही एक समस्या होवून जाते. यावर मात करण्यासाठी काही उपाय केले तर यातून सुटका होण्यास मदत होते. तसेच लसूण ही गुणकारी आहे. लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करून पाण्यासोबत गिळून घ्याव्यात. थोड्या वेळानंतर गाजराचा रस प्यावा. ज्येष्ठमधाचे चूर्ण अर्धा चमचा दूधासोबत घ्यावे. १० ते १२ तुळशीची पाने रात्री पाण्यासोबत घ्यावीत.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu