गेल्या आठवड्यापासून गोव्यात ठिकठिकाणच्या ब्युटी पार्लरमध्ये गोवा पोलिसांचं धाडसत्र सुरू आहे. पार्लसमध्ये चालत असलेल्या अवैध वेश्या व्यवसायामुळे हे धाडसत्र सुरू असल्याचं समजतंय. त्यातच काल रात्री पर्वरी इथल्या ‘लोटस ब्युटी आणि मसाज पार्लर’मध्ये पोलिसांनी धाड घातली असता पोलिसांना या ठिकाणी अभिनेता सचित पाटील आढळला. यानंतर पोलिसांनी पार्लरवर कारवाई करत सचित पाटील यालाही अटक केली. सचितसोबत आढळलेल्या पाच मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आलीय.
Source : Online Updates.