Karanjya :
Karanji and gujiya are two indian sweets which have a similar look and appearance. Basically both karanji and gujiya are fried pastries with a sweet stuffing. kids love such sweet recipies.
साहित्य :- २५ ग्रम उडदाचे पीठ, २५ ग्रम लोणी, १०० ग्रम मैदा, ७५ ग्रम तांदळाचे पीठ, २५ ग्रम गव्हाचे पीठ, ५ ग्रम भाजलेले जिरे, १० ग्रमभाजलेली बडीशेप, २५ ग्रम बारीक कापलेले बेदाणे, २५ ग्रम भाजून वाटलेली खसखस, २५ ग्रम आल्याचा कीस तळून घेतलेला, १०० ग्रम भाजलेल्या दाण्याचा कुट, २५ ग्रम ओल्या नारळाचा भाजून घेतलेली कीस, मीठ व हिंग चवी पुरते, पाव किलो तेल तळन्या करीता.
कृती :- लोणी आणि चारही पीठ चांगले मिसळून घ्यावे, नंतर कोमट पाण्याने घट्ट भजून घ्यावे. त्यात थोडे हिंग व मीठ घालावे. नंतर दाणे कुट, बेदाणे, जिरे, नारळ कीस मिसळून सारण तयार करावे. त्यात खसखस वाटून टाकावी, भिजवलेल्या पिठाचे छोटे गोळे करावे गोळ्यांची पोळी लाटून अर्ध्या भ्गाला थोडे लोणी लावावे त्यावर थोडे सारण टाकावे व पोळी दुमडावी किनार चांगली चीकटून बंद करावे, करंजी तेलात तळताना फुटणार नाही त्यासाठी, अश्या सर्व करंज्या तयार करून ठेवाव्यात, नंतर तेलात तळून घ्याव्यात.
Source : Marathi Food Recipes.