Love is Blind! Prem he andhade asate. this article give you information about love. when we fall in love we simply become a blind. we don’t see the rest of the world.
म्हणतात कि ”प्रेम आंधळे असते.. प्रेमात चुकीच्या गोष्टी केल्या तरी त्या योग्य वाटतात.पण नंतर मात्र पश्चात्ताप करावा लागतो. उदाहरणार्थ एक घटना म्हणजे मुलीने लग्ना नंतर प्रेग्न्न्सीची चाहूल लागताच टेस्ट करून घेतली तेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉंझिटिव्ह निघाली ती एकदम खुश होवून गेली. भावी आयुष्याचे बाळाचे गोड स्वप्न बघू लागली. नंतर रुटीन चेकअप मध्ये ए.एन.सी. प्रोफ़ाईल टेस्ट करण्यात आली तेव्हा त्यांची–एच.आय.व्ही टेस्ट पॉंझिटिव्ह आली हे एकूण तिचे धाबेच दणाणले. चेहरा गरकन उतरला. पुढे तिची व तिच्या होणार्या बाळाची विधुळ वाट पूर्णपणे तिच्या चेहर्यांवर दिसत होती. पती तर अस्सल खानदानी होता व देव भक्त, सज्जन, बोलायला एकदम मिठास! त्याचे पण रक्त तपासण्यात आले अपेक्षेप्रमाणे त्यांची हि एच.आय.व्ही.टेस्ट पॉंझिटिव्ह आली. त्याचा विवाहपूर्व बरेच ठकाणी शरीर संबंध असल्याने असा धोक होतो. मग गुढग्यात मान घालून हमसून रडण्यात काय अर्थ तर तेव्हा त्यांना यासर्व गोष्टींची कल्पना असतेच. पण काय उपयोग? या करीता आधीच टेस्ट झाली असती तर एका मुलीचे तसेच जन्माला येणार्या जीवाचे आयुष्य तरी बरबाद झाले नसते. पण तसे म्हटले तर दुर्दैवाने एच. आय. व्ही टेस्ट ची जबरद्स्ती आपल्याला करता येत नाही. त्या टेस्ट करण्याचा निर्णय संबंधित व्यक्तींचा संमती नंतर घेता येतो. आणि विशेष म्हणजे अनेकदा रिपोर्ट येईपर्यंत या भयंकर रोगाची कुनकुनही नसते. तेव्हा या बाबतीत थोडे घरच्या मंडळींनी मुला मुलींच्या बाबत सावध असायला पाहिजे. व समज ठेवूनच कुठलेही कार्य ठरवताना आपल्या पाल्यांच्या बाबत पालकांनी दक्षता बाळगायला हवी म्हणजे पुढच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच बर्याच लहान वयात मुलांना गुटका, पान वै, च्या सवयी असणे म्हणजे धोकादायक आहे, याही बाबत सावध असायला पाहिजेत, यामुळे टी.बी.च्या रोगांची शक्यता असते अश्या वेळी ऐन तारुण्यात मुलांवर मृत्युचा धोका ओढवून, संसारात पत्नीवर आपत्ती जनक संकटे येतात व आई वडिलांवर घरचा करता व्यक्ती निघून गेल्यावर संकटे येवून पडतात.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Updates.