डेक्कन चार्जर्स बाद झाला

Like Like Love Haha Wow Sad Angry बीसीसीआयनं कोची टस्कर्स केरलाचा खेळ खल्लास केला होता आणि आता डेक्कन चार्जर्सलाही अलविदा...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

deccan chargers out from iplबीसीसीआयनं कोची टस्कर्स केरलाचा खेळ खल्लास केला होता आणि आता डेक्कन चार्जर्सलाही अलविदा केला आहे. करारातील नियमांचा भंग केल्यामुळे चार्जर्सना डिस्चार्ज करण्याचा निर्णय आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलनं घेतला आहे. बीसीसीआयची आयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीग बदनाम आहे. या लीगच्या बदनामीची मालिका कायम आहे. आयपीएलच्या या बदनाम पीचवर क्लीन बोल्ड झाली डेक्कन चार्जर्सची टीम. बीसीसीआय़च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कनला निलंबित करण्यामागे त्यांनी करारात नियमांचं उल्लंघन केलं असं कारण दिलंय. ‘डेक्कन क्रोनिकल्स’ सध्या फायनान्शिअल क्रायसिसचा सामना करतेय. त्यामुळे क्रोनिकल्स चार्जर्समध्ये पैसे गुंतवू शकत नव्हती आणि क्रिकेटपटूंची थकबाकीही देऊ शकत नव्हती.

Source : Online News.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories