केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन. महाराष्टातील राजकारणातले अनमोल रत्न काळाच्या पडद्याआड…वयाच्या ६८व्या वर्षी निधन. यकृत आणि किडनीच्या आजाराने केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन चेन्नई येथे हॉस्पिटलमध्ये झाले. विलासरावांच्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) निकामी झाली होती. महाराष्टातील राजकारणातले अनमोल रत्न काळाच्या पडद्याआड. राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांचे आज दुपारी चेन्नईत निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. यकृत व मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असलेल्या विलासरावांवर चेन्नई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. विलासरावांच्या निधनामुळे देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदे व सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Source : Marathi TV.
1 Comment. Leave new
sad news