शनीची साडेसाती




Like
Like Love Haha Wow Sad Angry

shanichi sadesati ani kalशनीची साडेसाती हि तीन टप्प्यात येते. त्याचा काळ हा सर्व साधारतः दोन ते तीन वर्षाचा असतो. शनीची साडेसाती ही तीन टप्प्यांमध्ये आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असते. साधारण अडीच वर्षांचा एक टप्पा याप्रमाणे ३ टप्प्यात ही साडेसाती परिणाम करून जाते.

पहिला पायरी –

या टप्प्यात व्यक्तिच्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होतात. जमाखर्चाचा ताळमेळ बसणं कठीण होतं. कमाईपेक्षा खर्चाचं प्रमाण वाढतं. कुठलीही योजना पूर्ण होण्यात अनेक विघ्नं येतात. आर्थिक समस्यांमुळे अनेक कार्य पूर्ण होऊ शकत नाहीत. आरोग्यही बिघडण्याची शक्यता असते. परदेशगमनाचे आलेले योगही टळतात. पती-पत्नींमध्ये कुरबुरी वाढू लागतात. या संबंध कालखंडात जेवढी आपण मेहनत करतो, त्याप्रमाणात फळ मिळत नाही.

दुसरा पायरी –

या काळात आपल्या कौटुंबिक आणि व्यवसायिक जीवनात अनेक चढउतार येतात. नातेवाईकांकडूनच त्रास होण्यची जास्त शक्यता असते. कधी कधी कुटुंबापासून दूर रहावं लागतं. आजारपणं वाढतात. मित्रमंडळाकडून मदत मिळणं बंद होतं. प्रत्येक कामात अडथळे येत राहातात. नैराश्य येण्याची दाट शक्यता असते.

तिसरा पायरी –

या काळात आपल्या भौतिक सुखात बाधा येण्यास सुरूवात होते. सतत भांडण-तंटे, गृहकलह यांनी नानसिक स्वास्थ्य बिघडतं. ज्या राशीच्या लोकांची सध्या साडेसाती चालू आहे, आणि त्यातही तिसरा टप्पा, अशा लोकांनी कुठल्याही वादात न पडलेलंच उत्तम.

Source : Marathi Lekh.

Shanichi Sadesati, If you are in trouble then you must need to pray the lord shani. read Shanichi Sadesati over marathi unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu