ए के हंगल यांचं निधन
Like
Like Love Haha Wow Sad Angry

AK Hangal no more - Times Nowए. के. हंगल यांचं निधन झालयं. वृध्दापकाळानं मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालयं. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते. सांताक्रुझ इथल्या आशा पारेख रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. १३ ऑगस्टला घरी असताना हंगल घसरून पडले. यावेळी त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर पाठदुखीचा त्रास असह्य झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छातीतही दुखत असल्याने त्यांना श्वास घेण्यातही त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना आशा पारेख हॉस्पिटलमधल्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती.  ए के हंगल यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केलंय. नमक हराम, शोले, शौकीन, आईना या सिनेमांतील त्यांची छोटी भूमिकाही उल्लेखनीय ठरली.

Source : Bollywood Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d