shri-ganesh-ani-bhakt-morya Ganapati Bappa Moraya – Miracles of Ganesha – aparam paaar … Now the only escape was a miracle which Ganesha could very well perform.
*मोरया म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेश भक्त, साधू पुरुष मोरया गोसावी, [शके १३७५ -१४६१] या साधू पुरुषाची गणेश भक्ती ईतकी पराकोटीची होती कि, त्याच्या भक्तांनी त्याला अश्या रीतीने गणपती बरोबरीचे स्थान दिले, *मोरयाचे गणेश भक्ताचे आई-वडील कर्नाटकातून पुण्याजवळील मोरगावात स्थाईक झाले. [मोरगाव हे गणेशक्षेत्र आहे] त्यांनी गणेशाची उपासना केल्या मुळे त्यांना पन्नाशीत पुत्रप्राप्ती झाली.या पुत्राचे नाव मोरया ठेवले. * मोर्याने लहानपणी वेदाध्यायन केले. पुढे थेउरला जाऊन तपश्चर्या केली, त्यावेळी त्याला गणेशाचा साक्षात्कार झाला. नंतर ते मोरया गोसावी म्हणून ओळखले जाऊ लागले. *आई-वडिलांच्या निधना नंतर मोरया गोसावी पुण्या जवळील चिंचवड येथील आश्रमात राहू लागले. प्रत्येक चतुर्थीस ते मोरगाव येथील गणपतीच्या दर्शनाला जात. एकदा मंगलमूर्तीने त्यांना स्वप्नात सांगितले, ”अशी पायपीट करू नको, कऱ्हा नदीतून मला बाहेर काढ, आणि घरी घेऊन जा”. * साक्षात्कार नुसार त्यांनी केले: व चिंचवड येथे गणेश मूर्तीची स्थापना केली. १४६१ साली त्यांनी चिंचवड यथे जिवंत समाधी घेतली. पुढे त्यांच्या चिंतामणी नावाच्या मुलाने त्या समाधीवर मंदिर उभारले, दरवर्षी मार्गशीष वद्य तृतीय ते षष्टी याकाळात त्या मंदिर परिसरात मोरया पुण्यतिथीचा उत्सव साजरा केला जातो.
Source : Marathi Articles.
1 Comment. Leave new
nice information….