indian-culture This is the general knowledge questions and answers section on “Indian Culture” with explanation for various interview, competitive examination and entrance …
भारतीय संस्कृती .
भारतीय काळ गणनेच्या पुस्तकास पंचांग म्हणतात. पंच अंगाणे काल खंडाची ग्रहांची स्थिती योग मांडून अनेक गणिते केली जातात. पंच्यांगाची पाच अंगे म्हणजे १ तिथी, २.वार, ३.नक्षत्र, ४.योग आणि करण हे होत. या पाच अंगांनि विचर करून तयार केलेली दिन दर्शिका किंवा काल गणक पुस्तिका म्हणजे पंच्यांग होय. या काल गणनेचा श्री गणेशा नवीन वर्षाचा म्हणजेच संवत्सराच्या प्रारंभापासून होतो. व भारतीय कालगणने नुसार चैत्र वर्ष प्रतीपदा होय. भारतीय संस्कृतीत अंकाखेरीज प्रत्येक वर्षाची संवत्सराची ओळख हि वैशिष्ट पूर्ण नावाने होते. या संवत्सराचे नाव सर्वजीनाम-संवत्सर असून श्री शालिवाहन शके हा प्रारंभ होय. भारतीय संसकृती हि पर्यावरणाशी निगडीत आहे. आणि म्हणूनच भारतीय नव वर्षे साजरे करताना सृष्टीतील तरू, लता नवीन कोवळी हिरवी पाने परिधान करतात तसेच देव देवतांना पाने, फुले, फळे, दुर्वा, मंजुळा, मुळी अर्पिल्या जातात. तसेच नद्या, पहाडे, पर्वते, धरती, चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्रे हि सर्व पुजल्या जातात. ह्या सर्व बाबीं वरून लक्षात येते कि आपल्या भारतीय संस्कृतीचा पर्यावरणाशी किती निगडीत संबंध आहे. म्हणून म्हटल्या गेलेले आहे ”जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महंन मधुर ते ते ”व ” वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ”.
हिंदू संसकृती आणि दैवते !
सनातन काळा पासून हिंदू धर्मसंस्कृती हि अतिशय सृजनशील व बंधुभाव जपणारी आहे. मोठेपणाचे कोणतेही अवडम्बर या सस्कृतीला मान्य नाही.म्हणून या संस्कृती मधील थोर संत व महापुरुष स्वत:ला ”दास” नावाने संबोधतात.तर महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे अधर्वयु श्री संत तुकाराम महाराजांनी चक्क पांडुरंगाच्या चरणी” लहानपण देगा देवा ”म्हणून आग्रह धरला.
परंतु शांती प्रिय असलेला हा धर्म भेकड किंवा पुचाट कल्पनांना थारा देणारा नाही. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच बहुसंख्य हिंदू देव देवता ह्या बहुभुजांकृत असून,बहुशस्त्र- धारकहि आहेत, ” शास्त्राचे रक्षण” हे शस्त्रानशिवाय शक्य नसल्याची मान्यता या धर्मात आहे आणि म्हणूनच हिंदू देवदेवता या सशस्त्र आहेत,या शिवाय भक्त नेहमीच देवीदेवतांना संकटमोचन म्हणून संबोधित असल्याने भक्त रक्षणार्थ हिंदू देवतांनी शस्त्रे धारण केलेली आहेत. मुळात हिंदू धर्म संस्कृती हि मातृसत्ताक असल्याने या धर्मात ” देवी” स्वरूप देवतांना अन्यन साधारण असे महत्व आहे.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Unlimited.