चर्चगेट-विरार लोकल अंधेरी स्थानकावर येताना रुळ बदलत होती तेवढय़ात विरारहून फास्ट लोकल आल्याने चर्चगेट लोकलला ब्रेक लावावे लागले. परिणामी या गाडीचे दोन डबे घसरून फास्टवर आदळले. रात्री सव्वा अकारच्या सुमारास हा प्रकार घडताच विरारकडे जाणार्याक फास्ट लोकल बंद करण्यात आल्या. गाड्या किमान अर्धातास उशिरा धावत होत्या. लोकल थांबल्याबद्दल काहीच सूचना देण्यात येत नव्हती.
जवळपास तीन ते चार तास लोकल का हलत नाही हे बघण्यासाठी संतप्त प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. नंतर वैतागलेल्या प्रवाशांनी संताप अनावर होऊन प्रवाशांनी गाडीच्या काचा फोडल्या. एकीकडे पाऊस कोसळत होता, तर दुसरीकडे रेल्वेकडून कुठलीही घोषणा होत नव्हती यामुळे हाल झालेल्या प्रवाशांनी तोडफोडीचा मार्ग अवलंबला. प्रवाशांचा संताप बघून दोन्ही गाड्यांचे मोटरमन पळून गेले.
Leave a Reply