विद्यार्थी जीवन आणि त्याची लक्षणे.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
611

student-life, Student Life would like to acknowledge the Attawandaron / Attiwandaronk (Neutral) people on whose traditional territory the University of Guelph resides and offer …

विद्यार्थी जीवन आणि त्याची लक्षणे.

student life and characterestics
शाळा अथवा कॉलेजात शिक्षा ज्ञान प्राप्तीसाठी जाणारे प्रत्येक मुल तर विद्यार्थीच आहेत, परंतु काही जाणून घेणे अथवा शिकण्यासाठी सार्थक प्रयत्न करणारी प्रत्येक व्यक्ती सुद्धा विद्यार्थीच आहे, विद्यार्थी जीवनाचे कोणतेही वय नसते, बाल असो वा वृद्ध असो प्रत्येक महापुरुष आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत विद्यार्थी दशेत वावरलेले आहेत, कारण जीवन आहे शिकत राहण्याचे व पुढे चालत राहण्याचे नाव, “विद्यार्थी जीवन” हा जीवनाचा ”सोनेरी क्षण” आहे.  आदर्श विद्यार्थ्याची लक्षणे अशी आहेत.
*  काक [ कावळा] —  कावळा आकाशात स्वच्छंद विहार करीत असताना तीव्र दृष्टी द्वारे जमिनीवर पडलेल्या खाद्य पदार्थाला पाहून चपळतेने तेथे पोहोचतो व भक्ष प्राप्त करतो. त्याच प्रकारे विद्यार्थ्याने सुद्धा ज्ञान प्राप्ती साठी तीव्र जीज्ञांसा ठेवावी. तसेच आपले लक्ष प्राप्त करावे.*  बगळा — बगळा नदीकिनारी एका पायावर उभा राहून ध्यानमग्न असतो. मासळी वगैरे आली तर क्षणात त्यांचा घास घेऊन पुन्हा ध्यानस्य होतो. विद्यार्थ्याने सुद्धा अध्ययनात रममाण व्हावे ज्ञान विज्ञांनाबाबत गोष्टीना ग्रहण करून निरंतर प्रगती पथावर पुढे चालत राहावे.* श्वान [कुत्रा ] —जसा निजलेल्या कुत्र्या जवळून हळूच जाताना सुद्धा तो जागृत होतो, त्याच प्रकारे विद्यार्थ्याने सुद्धा आपल्या जीवन लक्षाला प्राप्त करण्यात सदैव सावधान व जागरूक असावे.  त्याची झोप सात्विक असावी, अति झोपेने आळस व वेळेचे भान न राण्याने त्याचे नुकसान होऊ शकते.* अल्पाहारी — विद्यार्थी जीवन साधनां व तपस्येचे जीवन आहे, एक अध्ययन विद्यार्थी नेहमी साधे सात्विक तसेच अल्प भोजन घेणारा असतो, तामसिक, राजसिक तसेच अधिक आहार वाल्या विद्यार्थ्याच्या जीवनी शक्तीचा मोठा भाग भोजन पचविण्यात, झोप, आळस तसेच तना-मनाच्या रोगांचा सामना करण्यातच खर्च होतो. विद्यार्थी जीवनाच्या यशस्विते साठी आरोग्याच्या प्राकृतिक नियमांचे पालन करणे अती आवश्यक आहे.

* गृह्त्यागी —  एक आदर्श विद्यार्थी विद्यार्जनासाठी गृह्त्यागास संकोच करीत नाही. त्याने अध्ययनासाठी घरापासून दूर- दूर जाण्यासाठी तत्पर असावे.

 

Source :Marathi Unlimited Articles.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
611
, , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu