उन्हाळ्याची सुटी अखेर आज संपली. मुंबई व उपनगरांतील काही शाळांनी दोन दिवसांपूर्वीच शाळा सुरू केल्या असल्या तरी शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशानुसार बहुतांश शाळांच्या उद्या घंटा वाजतील. बालवाडी, शिशुविहारमध्ये यंदा पहिल्यांदाच नाव नोंदविणार्या चिमुकल्यांच्या खरेदीला बाजारपेठेत गेले चार दिवस उधाण आले होते. त्यांच्या पसंतीचे दप्तर, आवडत्या रंगाची वॉटर बॉटल आणि डबा यासाठी त्यांचा हट्ट सुरू असलेला पाहायला मिळाला.मुंबई पालिकेच्या शाळा १,३२७, खाजगी अनुदानित ४३५, विनाअनुदानित ६९, कायम विनाअनुदानित 0४, पालिकेच्या शाळेत सुमारे ४ लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात तर खाजगी प्राथमिक शाळांत सुमारे ३ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात.
Source :Online.
Leave a Reply