कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पावसाने शनिवारपासून कोकणात मात्र रौद्र रूप धारण केले आहे . अतिवृष्टीमुळे रविवारी आडवली स्टेशनजवळ रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पाच तासांसाठी ठप्प झाली तर , अनेक ठिकाणी पावसामुळे रस्तेवाहतूकही कोलमडून गेली. रत्नागिरीतील संगमेश्वर, लांजा, खेड आदी भागांमध्ये शनिवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे . येथील आडवली रेल्वेस्टेशनजवळील रेल्वेमार्गाजवळ रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली .
Leave a Reply