सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांच्याखेरीज शिवाजीराव निलंगेकर, बाबासाहेब कुपेकर व राज्याचे विद्यमान जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यासह इतरांविरुद्ध ‘आदर्श’ सोसायटीच्या घोटाळ्याच्या संदर्भात करण्यात आलेल्या आरोपांच्या अनुषंगाने, कोणताही भेदभाव न करता, सखोल तपास करण्यात येत असल्याचे केंद्रीय गुप्तचर विभागाने मुंबई उच्च न्यायालयास सांगितले आहे.
विलासराव देशमुख- घेतलेल्या खास निर्णयांमुळेच ‘आदर्श’वर आणखी १२ मजले चढले. त्या बदल्यात उत्तम धाकरे, अमोल कारभारी व किरण भडांगे यांना आदर्शमध्ये फ्लॅट दिले गेले. त्यासाठी १.0४ कोटी रु. आरोपी व माजी आमदार कन्हैयालाल गिडवानी यांच्या अपेक्षा इपेक्स या कंपनीच्या खात्यातून दिले गेले. हे तिघेही अगदीच मामुली लोक असल्याने विलासरावांनी घेतलेले हे बेनामी फ्लॅट असावेत, असा आरोप.
सुशीलकुमार शिंदे- ‘आदर्श’ला भूखंडाचे इरादापत्र व वाटपपत्र दिले गेले. किमान ७१ सदस्य झाल्याखेरीज भूखंड न देण्याची अट होती. २0 सदस्यांची नावे मंजूर झाली होती. शिंदे यांनी आणखी ५१ नावे मंजूर केल्याने सोसायटी भूखंडासाठी पात्र ठरली. याच्या बदल्यात मेजर खानखोजे यांना दोन फ्लॅट दिले गेले. हे फ्लॅट शिंदे यांचे बेनामी असल्याचा आरोप.
News Source : Online
1 Comment. Leave new
chor hai sale ye sab log……