पर्यटक चीनची भिंत आकाशातूनही पाहतात. या भिंतीची लांबी ८,८५१.८ कि.मी. असल्याचे आजपर्यंत मानले जात होते; मात्र नव्याने केलेल्या मोजणीत ही भिंत २१,१९६.१८ कि.मी. लांब असल्याचे आढळून आले आहे. या भिंतीवर ४३,७२१ बुरूज आहेत.
चीनच्या सरकारी वर्तमानपत्रात याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली. भिंतीच्या जतनासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थेचे संचालक यान जियानमीन यांनी सांगितले की, ही भिंत चीनच्या मिंग घराण्याने बांधली, असे आजपर्यंत मानले जात होते. नव्या संशोधनात असे आढळून आले आहे की, चीनच्या सर्वच प्राचीन राजघराण्यांनी ही भिंत बांधण्यासाठी योगदान दिले आहे. कीन घराण्याचा पहिला सम्राट कीन शि हुआंगचे नाव भिंतीशी जोडण्यात येते.