राज्यसभेसाठी नामांकित मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर बुधवारी शपथ घेणार आहे. तर बॉलीवूड अभिनेत्री रेखा आज मंगळवारी शपथ घेयील. एक खासगी वाहिनीने हे वृत्त दिले आहे. सचिन आणि रेखला २७ एप्रिल रोजी राज्यसभेसाठी मनोमित करण्यात आले होते. दोन आठवडे झाल्यानंतरही दोघांनी शपथ घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नेमणूकी बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हे दोघेही खासदारकीसाठी गंभीर नसल्याचे म्हटले जात होते. परंतु दोघांच्या शपथविधीचा दिवस निश्चित झाल्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे. सध्या सचिन (IPL) मध्ये व्यस्त आहे. उल्लेखनीय म्हणजे सचिनच्या नावाची शिफारस सोनिया गांधी यांनी केली होती.
आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.
खालील बटण लाइक आणि शेअर करा
Loading Comments...
%d
तुमचा अनुभव सुधारण्यासाठी ही वेबसाइट कुकीज वापरते. आपण ही साइट वापरणे सुरू ठेवल्यास, आपण त्यास सहमती देता.