पेट्रोल ७.५0 रुपयांनी महागले!

Like Like Love Haha Wow Sad Angry पेट्रोल ७.५0 रुपयांनी महागले! तेल कंपन्यांच्या तोट्यात होणारी कोट्यवधी रुपयांची वाढ आणि दुसरीकडे...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

पेट्रोल ७.५0 रुपयांनी महागले!

petrol old rates and new rates
तेल कंपन्यांच्या तोट्यात होणारी कोट्यवधी रुपयांची वाढ आणि दुसरीकडे डॉलरपुढे ५६ रुपयांची लोळण घेतलेल्या रुपया अशा अर्थकारणाच्या जागतिक दबावामुळे आलेल्या अगतिकतेतून तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात साडे सात रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला.

मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू झाली आहे. प्रत्यक्षात ही दरवाढ ६ रुपये २८ पैशांची असून, स्थानिक कर तसेच व्हॅट किंवा विक्रीकर पकडून सरासरी दरवाढ ही साडे सात रुपयांची आहे. या निर्णयानंतर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७८ रुपये १६ पैशांवर पोहोचला आहे. राज्यात पेट्रोलची सर्वाधिक किंमत ही उपराजधानीत अर्थात नागपुरात असेल. तेथील दर ८१ रुपये ९३ पैशांवर पोहोचला आहे.

शहर जुने दर नवे दर

दिल्ली ६४.६४ ७३.१४

मुंबई ७0.८६ ७८.१६

नागपूर ७४.४३ ८१.९३

औरंगाबाद ६९.८७ ७७.३७

पुणे ७0.९४ ७८.४४

नशिक ७0.७४ ७८.२४

सांगली ७0.५४ ७८.0४

Source : Marathi Online

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories