महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी तसेच अशा प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याची तरतूद असलेले खासगी विधेयक आज खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत मांडले. अशा अत्याचारांना पायबंद घालणे तसेच या प्रकरणांची कोर्टात जलदगतीने सुनावणी करण्यासाठी खा. दर्डा यांनी हे विधेयक मांडले आहे.
देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशा प्रकरणांवर विचार करून ते निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
खा. दर्डा यांनी ‘व्हिसल ब्लोअर’ संरक्षण विधेयक व विकृती विज्ञान प्रयोगशाळा व क्लिनिक (नियमन व नियंत्रण) विधेयकदेखील राज्यसभेत मांडले. आज राज्यसभेत एकूण सात खासगी विधेयके मांडण्यात आली. त्यात खा. दर्डा यांच्या या विधेयकांचा समावेश आहे.