देशभरात भेडसावणारा स्त्री भरून हत्त्ये सारखा सामाजिक व गंभीर विषयाला पुढे आणणारा “सत्येमेव जयते” या रियालिटी शोमधून व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी अभिनेता अमीर खान याला पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. तसेच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी राज्य शाश्नाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे अव्वाहन त्याला या पत्रा द्वारे केले आहे. २५ प्रकारांमध्ये २७ डॉक्टर्स आणि ४ व्यक्तींना दोषी ठरवून त्यांच्यावर दंड व कैदेची शिक्ष्य सुनावण्यात आली आहे. या कायद्या अंतर्गत महाराष्ट्र वैदेकीय परिषदने ४ डॉक्टरांची नोंदणी रद्द केली असून ४० डॉक्टरांना दोषी ठरवून त्यांची नोंदणी रद्द करण्याची अपील सुद्धा केली आहे.