खमंग दही – पुरी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Khamang Dahi Puri :

Khamang Dahi Puri is very testy recipe if we have aloochi chutney with it. It is very simple and quickly prepared within 10-15 minutes only. It is spicy, sweet and tangy with crispy texture.


साहित्य –
१ वाटी मैदा, २ वाट्या कणिक, १/२ वाटी बेसन, तिखट, मीठ, तेल, मटकीची उसळ, गोड दही, चवीला  साखर, एक पाव उकडलेले बटाटे,  कोथिंबीर जिरे पावडर, मिरची पावडर.

कृती – मैदा, कणिक, बेसन, एकत्र करून  मीठ मोहन घालून घट्ट भिजवून घ्या. मध्यम आकाराच्या लाट्या तयार करून थोड्या जाडसर पुऱ्या लाटून तळून घ्या. चांगल्या फुगायला हव्या. पुऱ्या करण्या पूर्वी बटाट्याचे लहान लहान काप करून ठेवा. दह्यात चवीप्रमाणे साखर, मीठ घाला, फुगलेली पुरी फोडून मध्यभागी उसळ, बटाट्याचे काप तयार दही घाला. वरून आवडी प्रमाणे, मिरची पावडर कोथीमबीर घाला. सर्व करा. आवडी प्रमाणे कमी जास्त किंवा हवे तेवडे घेवू शकता. आवडत असेल तर बारीक शेव व कांदा वरून घेवू शकता.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu