फेसबुकसाठी आता मोजा पैसे!

Like Like Love Haha Wow Sad Angry फेसबुकसाठी आता मोजा पैसे! फेसबुकने आता ह्यपोस्ट हायलाईट सुविधेसाठी २ डॉलर इत्६ाकी रक्कम...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

फेसबुकसाठी आता मोजा पैसे!

facebook is charging now
फेसबुकने आता ह्यपोस्ट हायलाईट सुविधेसाठी २ डॉलर इत्६ाकी रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आजवर मोफत सुविधेचा डंका पिटणार्‍या फेसबुकचा नवा चेहरा समोर आला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यानुसार, ज्यावेळी माहिती अथवा फोटो अपलोड करायची आहे, त्यावेळी दोन पर्याय तुम्हाला विचारण्यात येतील. पहिला अर्थातच मोफत आणि दुसरा पर्याय दोन डॉलर भरून अपलोड करण्याचा आहे. मोफत पर्यायाचा अवलंब केल्यावर तुमच्या वॉलवर जरी तुमचा मजकूर तातडीने अपलोड झाला तरी, जनरल न्यूज फीड किंवा मित्रांना दिसण्यासाठी त्या मजकूराला वेटिंग लिस्टवर राहावे लागेल. तर २ डॉलर भरून पोस्ट करण्यात येणारा मजकूर तातडीने किंवा सध्या ज्या प्रमाणे दिसतो त्या प्रमाणे दिसेल. तसेच पैसे भरून केलेल्या मजकूराला पिवळ्य़ा रंगाचा टॅग लागेल. सध्या सोशल नेटवर्किंगसाईटमध्ये फेसबुक हे सर्वात आघाडीवर आहे. त्याच्या युझर्सची संख्या १00 कोटींच्या वर असून त्यात वाढ सुरुच असल्याने ‘स्पेस मॅनेजमेंट’ म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यामुळे कंपनीच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होईल. सध्या कंपनीच्या उत्पन्नाचा स्त्रोत केवळ जाहीराती हाच असून, गेल्यावर्षी कंपनीने जाहिरातीच्या माध्यमातून १.१४ बिलियन अमेरिकी डॉलर एवढा महसूल मिळविला.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories