प्रंतप्रधानांसह १५ केद्रीय मंत्री भ्रष्ट!
१) टीम अन्नाचा सनसनाटी आरोप
२) स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी करा
प्रंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यासह केंद्रीय १५ मंत्री भ्रष्ट असल्याचा सनसनाटी आरोप करून या मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी स्वतंत्र यंत्रणेकडून करण्याची मागणी टीम अन्नाचे एक प्रमुख सदस्य अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्ली येथे केली.
टीम अण्णाकडून या संदर्भातील मागणीचे एक पत्र डॉ मनमोहन सिंग यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या या मंत्र्यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी विनंती त्या पत्रात करण्यात आली आहे. भ्रस्ताचाराचा आरोप असलेल्या या सर्व मंत्र्यांची नावे त्या पत्रात दिली आहेत. हि चौकशी करण्यासाठी आपण ६ न्यायमूर्तीची नावे सुधा त्यात सुचविली असून त्यापैकी कोणत्याही तीन न्यायमूर्तीनी हि चौकशी करावी व त्यातीलच एकाला या चौकशी समितीच्या प्रमुखपदी नेमण्याची विनंती करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे त्या १५ भ्रष्ट नेत्यांमध्ये खुद्द डॉ मनमोहन सिंग यांचा नावाचा समावेश आहे.
कृष्णा ठोकणार मानहानीचा दावा :
टीम अण्णाने भ्रष्ट मंत्रांच्या यादीत नाव घेतल्याने पर्रास्त्र मंत्री एस. एम कुष्णा चांगलेच भडकले असून त्यांनी आता त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा निर्धार केला आहे. टीम अन्नाला धडा शिवण्यासाठी त्यांनी आता कोर्टात जाण्याचा निश्चय केला असल्याचे वृत्त आहे.
Source : Marathi Online
आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.
खालील बटण लाइक आणि शेअर करा
Loading Comments...
%d
तुमचा अनुभव सुधारण्यासाठी ही वेबसाइट कुकीज वापरते. आपण ही साइट वापरणे सुरू ठेवल्यास, आपण त्यास सहमती देता.