Angur Malai :
To prepare angoor malai we want 1 litter of milk, 1 bowl paneer, 100 gm milk powder, 1 and 1/2 t-spoon custered powder, 8 t-spoon sugar, cashew nuts, almond nuts, pista and other dry fruits are used.
साहित्य :
एक लीटर दूध, एक वाटी पनीर, शंभर ग्राम मिल्क पावडर, दिड चमचे कस्टर्ड पावडर, आठ लहान चमचे साखर, काजू-बादाम-पिस्त्याचे काप..
कृती : पनीर एकजीव करून त्याचे छोटे – छोटे गोले करावे. ते गरम पाण्यात उकाडून पानी दाबुन, निथळून घ्यावेत. दुध गरम करावे. थोडी उकळी आल्यानंतर मिक्सरचा भांड्यात दुध, मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर आणि साखर एकत्र करून फिरवून घ्यावे: हे मिश्रण उकळत्या दुधात टाकावे. कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरमुळे दुध चटकन दाट होते. जास्त वेळ उकळवावे लागत नाही. दुध दाटसर झाल्यानंतर ग्यास बंद करावा. वरून काजू – बदाम – पिस्त्याचे काप टाकावेत. तयार केलेले पनीरचे गोळे दुधात घालावेत. दोन तास मुरल्यानंतर सर्व्ह करावे. अशा प्रकारे तुम्ही अंगूर मलई बनवू शकता.
लिखाण :
प्रणाली कालबांडे
pranali_kalbande111@gmail .com
nagpur