मराठी चित्रपट जगातील एक आनंदाची बातमी आहे. गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. समीक्षक आणि प्रेषकांनी उचलून धरलेल्या देऊळ या मराठी चित्रपटाने ५९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. देऊळ हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्याचबरोबर देऊळ चित्रपटासाठीच गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार देखिल मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान ‘शाळा’ सिनेमाने पटकावला आहे.
देऊळ चित्रपटाबरोबर प्यारी या चित्रपटालादेखिल सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
‘द डर्टी पिक्चर’ मधील सिल्क स्मिताच्या भूमिकेसाठी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री विद्या बालनला त्याच चित्रपटासाठी यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहिर झाला आहे. विद्या बालनची या पुरस्कारामुळे राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्रिक झाली आहे.
News source:
www.marathi-unlimited.in
2 Comments. Leave new
गिरीश कुलकर्णी याचं अभिनंदन.
sarv marathi chitrapath baghnaryana abhinandan. deool is great movi.