महाराष्ट्रात वर्षभरात ९९ मंदिरांमध्ये चोरीच्या घटना !
हिंदूंनो, तुमच्या धार्मिक स्थळांचीसुरक्षा न करणार्या अशा हिंदुद्रोही शासनाला किती दिवस सत्तेवर ठेवणार ?
सनातन सांगत असलेला वाईट काळ तो हाच !
नागपूर, २२ डिसेंबर –
राज्यातवर्षभरात एकूण ९९ मंदिरांमध्ये चोरी झाल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती काल गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
(शासनातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! – संपादक)
आमदार दीप्ती चौधरी, मोहन जोशी यांनी वाईच्या मांढरदेवी मंदिरातील काळेश्वरी देवीच्या दागिन्यांच्या चोरीच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
त्यावर शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्हे यांनी पुणे, सातारा येथील मंदिरांतील चोर्यांचे दाखले दिले.
तसेच आता सांगली, कोल्हापूर येथेही असे दरोडे पडण्याची शक्यता व्यक्त केली.
शासनाने या चोर्यांविषयी कोणती काळजी घेतली, एकूण किती चोर्या झाल्या, त्यातील किती जणांवर कारवाई झाली, असे प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर उत्तर देतांना पाटील यांनी वरील माहिती दिली.