कॉमन म्यान चा छळ कशासाठी …सत्तेसाठी कि भ्रष्ट्राचार करण्यासाठी..?
कॉमन म्यान चा छळ कशासाठी …सत्तेसाठी कि भ्रष्ट्राचार करण्यासाठी..?
आण्णा सारख्या कॉमन म्यान ने.. खरी लोकशाही मजबूत केली..ज्या साविधानानेच..लोक सांसद निर्माण केली..त्याच संविधानाने .जनतेला भौतिक व साधन संपत्तीचा ….लोक हितकारक संविधान बनविण्याचा अधिकार जनतेला दिला आहे…किवा अशी तरतुत केली असताना…अन्नाचे आंदोलन हे अराजकीय आहे असे म्हणून विरोधाभास तयार करणारे हे भ्रष्ट्राचारी व सत्ताधारी काही नेत्यांनी विचार करणे जरुरीचे आहे.
देशाचा इतिहास पाहता .आज पर्यंत श्री रामचंद्रांपासून ते शिवाजी महाराज. पेशवे पर्यंत भगव्या झेंड्या खाली लढलेला देश आज पुन्हा एकदा कॉमन म्यान च्याच मागे उभा राहिला .. बाबा रामदेव .. श्री ..श्री रविशंकर …..याचा .भक्त परिवार मोठा असुनीही ते जनतेला इतक्या मोठ्या प्रमाणात आवाहन करू शकले नाहीत ..तेच आवाहन एका कॉमन म्यान ने केले या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयन्त काही भ्रष्ट्राचारी व सत्ताधारी नेते करत आहेत …अन्ना टीम वर आरोप करणार्यांनी …गांधीजीं .आंबेडकर हे संविधान बनवतेवेळी आजुबाजू ला किती स्वच्छ प्रतिमेचे लोक होते व त्यांचा इतिहास कडून पाहावा .कि त्याच्या मुळेच आज देश भ्रष्ट्राचाराच्या खाईत लोटला आहे याचा …आभ्यास करून पाहावा …त्या मुळे.. जे नवीन लोकपाल संविधान बनेल त्यामुळे नवीन हुकुमशाही तयार होईल असे म्हणणे हा विरोधकांचा .जनतेसाठी तयार केलेला विरोधाभास आहे कारण लोकपाल विधेयक हे फक्त झालेल्या भ्रष्ट्राचारा साठी नसून इथून पुढे होणार्या भ्रष्ट्राचारा साठी सुद्धा असेल …
सर्व देशातील जनता…जातपात धर्म पंथ, भाषा .प्रांत ,,या भिंती पडून एकत्र आली शालेय विध्यार्थी …तरुण वर्ग ..वयोवृध्द याचा विलक्षण सहभाग आणि आहींसक मार्गाने झालेले आंदोलन …ती हि एका कॉमन म्यान मुळे
एकेकाळी देश्याच्या सरहदीवर उभा राहिलेला जवान कॉमन होवून जनतेच्या हक्क साठी लढतो त्याला विरोध करून सत्ताधरी ..स्वताची कबर खोदत आहेत …सत्ताधरी पक्ष भ्रष्ट्राचारी यांच्या अश्या विरोधामुळे…हे विरोधक कॉमन म्यान चे काहीच वाकडे करू शकत नाही ..कारण त्यांच्या मागे कॉमन जनता उभी आहे … आज पर्यंत जनतेचे भले करू न शकलेला सत्ताधारी पक्ष भ्रष्ट्र नेते जनतेची तरी काय वाकडे करणार आहे …
by Anil Sipekar