पानगळ…..




पानगळ….. आता याविषयी लिहिण्यास एक प्रसंग कारणीभूत ठरला….. असाच सकाळी लायब्ररी पासून खोलीच्या दिशेने जात होतो…अचानक खूप पाने रस्त्यावर पडलेली दिसली….एरवी ती असतात नेहमीच…पण यावेळेस काहीशी वेगळी भासत होती….माझ्या मनाला पडलेला प्रश्न नेहमीचा….एकेक पान गळत असताना देखील….खंबीरपणे उभा असलेला तो वृक्ष…..निसर्ग देतो नेतो….परत देतो….हे चक्र चालायचे….माणसाचे देखील असेच होते का….?

Pangal

होय…..लहानपणी आपल्याला केस नसतात…. हळू हळू ते येतात….कालांतराने मोठे होतात…. एका ठराविक वयानंतर ते जातात….याविषयी संकर्षण कऱ्हाडेंच्या कवितेतील एक ओळ मनाला खूप भावली…..जे निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं त्यात काय लाजायाचं…?

वसंत , ग्रीष्म, हेमंत,शिशिर हे ऋतुचक्र आणि पानगळीच्या ठराविक तऱ्हा…….वसंत आला की येतो बहर…..शिशिर करतो नुसताच कहर…..पण त्या झाडाला माहित असत…..कितीही कठीण परिस्थिती मध्ये उभा राहणे…..जीव त्याच्यात देखील आहे…..
विज्ञानाला साहित्याची जोड मिळाली आणि मला पण पानगळीवर काहीसे लिहू वाटले……..

पानगळ

पानगळीच्या नाना तऱ्हा
निसटून एकेक पान धरा
वसंत आला की येतो बहर
शिशिर करतो नुसताच कहर

सोडावे कधीतरी थोडेसे
मिळेल तेव्हाच पुरेसे
निसर्गाचा नियम पाळून
उभारेल मीही नव्याने गेले जरी एकेक पान गळून

विचार करताच मी पण झालो शांत
येईल का आधी होता तसाच वसंत
विचारांनी माझ्या मी गुरफटलो हवी थोडीशी उसंत
विचारांचा प्रवास आहे मला तितकाच पसंत

The Last leaf वाचत असताना
त्यातल्या कलाकाराला मी सलाम केला
निर्मितीत पण ताकत असते असा विचार मनात आला

निर्मिती मग ती नैसर्गिक असो की मानवी
त्यात जीव ओतून ती अजरामर करावी
बस एकच खूणगाठ मनाशी धरावी
आनंद वाटावा सतत दुःख मागे सारावी

  • -डॉ.ओंकार भाकरे
  • 9284701235
  • omkarbhakre14@gmail.com
  • Flat no 102 D Wing Venkateshwara Apartment Pharande Park Wadi BK Nanded
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड