Happy New Year Wishes 2023




Wishes, Messages, Happy New Year 2023

आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी
स्वागत करू नववर्षाचं.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवा बहार, नवा मोहोर,
नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला
नव्या वर्षाचे स्वागत करूया.

गतवर्षाची गोळाबेरीज करूया,
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा
करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक
शुभेच्छा…!

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी, हाती
येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या
सुरवातीला मनासारखे घडेल सारे !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

दाखवून गत वर्षाला पाठ चाले
भविष्याची वाट करुन नव्या
नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे,
समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि
आरोग्यदायी जावो.


दु:ख सारी विसरून जाऊ…
सुख देवाच्या चरणी वाहू ..
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…..
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या
कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड