Marathi Recipes Kothimbir Vadi

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Marathi Recipes Kothimbir Vadi- कोथिंबीर वडी रेसिपी

कोथिंबीर वडीसाठी साहित्य

  • बारीक चिरलेली कोथिंबीर २ वाट्या
  • ७-८ हिरव्या मिरच्या किंवा
  • १ मोठा चमचा लाल तिखट
  • १ चमचा मीठ
  • अर्धा चमचा साखर
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा तीळ
  • पाव चमचा हिंगपूड
  • पाव चमचा हळद
  • १ वाटी हरबरा डाळीचे पीठ

कोथिंबीर वडी कृती
चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वाटून, मीठ, साखर, जिरे, तीळ, हळद दोन चमचे तेल सर्व एकत्र करावे.त्यामध्ये पीठ कालवावे. कोथिंबीर पिठाचा गोळा एकजीव होण्यापुरते पाणी थोडे थोडे घालावे.हाताला तेल लावून, कोथिंबीर पिठाचा गोळा एकजीव करता येण्याइतपत झाला की, लांबट गोल करून तो वाफवून घ्यावा.दहा मिनिटे वाफवल्यानंतर गार झाल्यानंतर सुरीने कापून वडी तळाव्यात.फ्रीजमध्ये कोथिंबीर पिठाचा गोळा उकडून ठेवल्यास, दुसऱ्या दिवशी वड्या तळल्या तरी चालतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories