रसाळगड (Rasalgad)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

रसाळगड

रसाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे. २०२० ला श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत मधूमकरंद गड ते रसाळगड ही मोहीम झाली सादारं न १ लाख मावळे सहभागी झाले होते.सन १६६० च्या मोहिमेत शिवाजी राजांनी रसाळगड जिंकला आणि पुढे सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असावा.

गडावरील ठिकाणे
रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिले प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजात पोहचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्टच आहे. किल्ल्यावर लहानमोठ्या मिळून सुमारे १६ तोफा आहेत.संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय. समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाड्यात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाड्यांचे मोठा प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजावर तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामाही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठा प्रमाणावर आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu