रतनगड (Ratangad Fort)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

रतनगड

सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा तालुका आहे. अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे. रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. रतनगडाच्या उजवीकडे म्हणजे उत्तरबाजुला असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो. रतनगड आणि खुटा भंडारदरा धरणावरुन उत्तम दिसतात. भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो.

भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ शेडी नावाचे गाव आहे. शेंडी गाव पर्यटनाच्या सोयीच्या दृष्टीने काहीसे विकसित झाल्यामुळे सध्या पर्यटकांची याला चांगलीच पसंती आहे.रतनवाडीपासून 6 किलोमीटर अंतरावर, भंडारदरापासून 23 किमी, पुणे पासून 183 किमी आणि मुंबईपासून 197 किमी अंतरावर असलेल्या रतनगड हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात एक प्राचीन किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. हा किल्ला 4250 फुट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला, 400 वर्षांपूर्वीचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता.किल्ल्याला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक हे चार प्रवेशद्वार आहेत किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर आहे.अहमदनगर जिल्ह्यातील सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किमी अंतरावर ,भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला संदन दरी आहे.पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर इथे गर्दी असते.

संदन दरीतल्या वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही संदन दरीची सैर करणे एक स्मरणीय अनुभव आहे . आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी असा या दरीचा लौकीक असल्याचं सांगितलं जातं.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu